Tarun Bharat

सत्तेसाठी दुय्यम भूमिका घेणं काॅंग्रेससाठी धोकादायक- मिलिंद देवरा

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

काॅंग्रेस पक्षात नाराजी दिसून येत असतानाच आज नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ई़डीने समन्स बजावले आहे. यावरुन काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रभाग रचनेवरुन काॅंग्रेस शिवसेनेवर नाराज आहे. शिवसेनेकडून (Shivsena) काॅंग्रेसचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला जात आहे. नाना पटोले (Nana Patole), मिलिंद देवरा (Milind Devra) आणि रवी राजा (Ravi Raja) यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे जादा उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून प्रशासन आणि प्रशासक डाव टाकत असल्याचा आरोही केला जात आहे. या सर्व घटनेवर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

सत्तेसाठी दुय्यम भूमिका घेणं काॅंग्रेससाठी धोकादायक असल्याचे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरावरुन काॅंग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. दरम्यान मिलिंद देवरा यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. मिलिंद देवरा ट्विट करत म्हणतात, भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे म्हणून काॅंग्रेसने तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनून राहू नये. जिथे काॅंग्रेसचा जन्म झाला त्या मुंबईत काॅंग्रेस पक्ष संपता कामा नये. आपले नगरसेवक, कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचे मुंबईतील मतदारांप्रती आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले
शिवसेनेकडून काॅंग्रेसचं खच्चीकरण करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी फेटाळून लावला आहे. काॅंग्रेसची आम्हाला गरज आहे. संपूर्ण देशाच नेतृत्व काॅंग्रेसने करावं अशी आमची इच्छा आहे. काॅंग्रेसशिवाय विरोधी पक्ष पुढे जाऊ शकणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले
तपास यंत्रणाचां गैरवापर करत विरोधकांचा छळ होत असल्याचे ८ वर्षापासून पाहत आहोत. तर दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. यामुळे लोकशाहीवर मोठा आघात होत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठिशी आम्ही आहोतच. पण देशातील जनतेनेही पाठिशी रहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

चीनकडून LAC वर 50 हजार अतिरिक्त सैनिक, शस्त्रास्त्रे तैनात

datta jadhav

जाणीव नसलेल्या यादीमध्ये ‘बंटी पाटील’ टॉपला!

Sumit Tambekar

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे हा पूर्वनियोजित कट

datta jadhav

मान्सून महाराष्ट्रात दाखल

datta jadhav

महाराष्ट्र केसरीचा आखाडा सातारला रंगणार!

datta jadhav

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएचा छापा

Rohan_P
error: Content is protected !!