Tarun Bharat

शिरोळमधील शासकीय जमीन विक्रीस नगरपरिषदेचा विरोध; मोर्चा काढत जमीन ताब्यात देण्याची मागणी

शिरोळ/प्रतिनिधी

शिरोळ मधील श्री बुवाफन मंदिर समोरील सिटी सर्व्हे नंबर 2873 ची सार्वजनिक सरकारी जागा शिरोळ नगर परिषदेच्या ताब्यात राहावी, गावच्या हितासाठी शासकीय जमीन खाजगी व्यक्तीला न देता शहराच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आरक्षित  ठेवावी, या प्रमुख मागणीसाठी शिरोळ सार्वजनिक जागा बचाव कृती समिती व नगरपरिषद यांच्यावतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला,  दरम्यान, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले, ही खुली जागा नगरपंचायत ताब्यात द्यावी ती कोणत्या परिस्थिती आम्ही सोडणार नाही, असा इशाराही नगराध्यक्ष अमरसिंह  पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चासाठी ग्रामस्थ एकत्र आले. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला यांचा मोठा सहभाग होता. यावेळी शिरोळ येथील सिटी सर्व्हे नंबर 2873 च्या सरकारी जागेप्रश्नी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना धिक्कार असो, शिरोळ एकजुटीचा विजय असो, सिटी सर्व्हे नंबर 2873 ची जागा नगरपरिषदेच्या ताब्यात राहिलीच पाहिजे अशा घोषणा देऊन मोर्चेधारकांनी लक्ष वेधले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु झालेला मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयावर आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, डॉ अरविंद माने यांची भाषणे झाली, गावाच्या मालकीची जागा नगरपरिषदेकडे राहिली पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

कबनूर: प्रलंबित मागण्या बाबत कामगारांचा संप सुरूच

Archana Banage

रात्री वेळाने आलेल्या अहवालानुसार कोल्हापुरात दहा रुग्ण पॉझिटिव्ह

Archana Banage

फिफा वर्ल्डकपच्या फिव्हरमध्ये कोल्हापुरी फुटबॉलचा कीकऑफ

Archana Banage

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, ८५ बंधारे पाण्याखाली

Archana Banage

स्वाभिमानीची आज ऊस परिषद

Archana Banage

पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांना विशेष सेवा पदक

Archana Banage