Tarun Bharat

हाऊसिंग बोर्डमधील कृत्रिम तलावाला पालिकेची नोटीस

Advertisements

तलाव बनला होता डास पैदास केंद्र : परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोकादायक : सध्या तलाव केले रिकामी

प्रतिनिधी /डिचोली

 हाऊसिंग बोर्ड डिचोली येथील खुल्या जागेत गेल्यावषी गणेश चतुर्थीपूर्वी स्थानिक नगरसेवकाच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला गणेश मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावाला डिचोली नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. संबंधित नगरसेवकाला सदर तलावात पाणी साठणार नाही आणि त्यामुळे डासांची पैदास होणार नाही. तसेच त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

माजी उपनगराध्यक्ष भगवान हरमलकर यांनी सदर कृत्रिम तलावात भरून राहिलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत डिचोली सरकार सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्याकडे तोंडीच तक्रार केली होती. या तक्रारीला अनुसरून डॉ. साळकर यांनी पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, स्थानिक नगरसेवक विजयकुमार नाटेकर, तक्रारदार भगवान हरमलकर यांच्यासोबत तलावाची पाहणी केली होती.

सदर पाहणीवेळी तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी भरले होते आणि सदर पाणी गलिच्छ झाल्याने त्यात मोठय़ा प्रमाणात डासांची पैदास दिसून आली होती. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी पाहणीचा अहवाल डिचोली नगरपालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांना सादर केला होता. सदर अहवालात त्या कृत्रिम तलावाच्या उभारणीसाठी कोणत्याही प्रकारची आरोग्य ना हरकत घेण्यात आली नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यावर आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना मुख्याधिकारी शिरगावकर यांना केली होती.

या अहवालानंतर मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी संबंधित नगरसेवकाला नोटीस बजावली आहे. सदर कृत्रिम तलाव उभारण्यासाठी डिचोली नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला घेण्यात आलेला नाही. पालिका अधिकाऱयांनी या तलावाची पाहणी केली असता त्यातील पाणी खाली करण्यात आले होते. सध्या डेंग्यू मलेरियाची साथ असल्याने पाणी साठवून ठेवणे घातक आहे. डासांची पैदास होऊ शकते. आणि या भागात मोठय़ा संख्येने लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या आरोग्यास तसेच परिसरातील घरांमधील लोकांच्याही जिवितास धोका असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. त्यामुळे सदर तलावात पाण्याचा साठा होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली आहे.

गेल्यावषी हाऊसिंग बोर्ड येथे स्थानिक नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी खुल्या जागेत हाऊसिंग बोर्ड येथे गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एक कृत्रिम तलाव साकारला होता. गेल्यावषी मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर त्यातील पाणी खाली करणे आवश्यक होते. यावषी पावसाचे मोठय़ा प्रमाणात पाणी या तलावात भरल्याने तलावात डासांची पैदास झाली होती. या भागात हाऊसिंग बोर्ड भागातील लहान मुले खेळतात, त्यांच्या आरोग्यास असलेला धोका लक्षात घेऊन माजी उपनगराध्यक्ष भगवान हरमलकर यांनी आरोग्य अधिकाऱयांकडे तक्रार केली होती.

हाऊसिंग बोर्डमधील सदर जागा खुली व राखून ठेवलेली आहे. त्यावर तात्पुरता म्हणून पक्के बांधकाम करून कृत्रिम तलाव साकारण्यात आला होता. गणेश मूर्तींचे विसर्जनाच्या नावावर साकारण्यात आलेला सदर तलाव काम झाल्यानंतर हटविण्याची गरज होती. मात्र तसे न करता तो आहे तसाच ठेवण्यात आला आहे. या विषयी आपण गंभीर दखल घेणार असून प्रसंगी पंतप्रधानांनाही पत्र लिहिणार. प्रधानमंत्र्यांनी डिचोली नगरपालिकेला उत्कृष्ट नगरपालिका म्हणून मान दिला होता. सदर मान अशाच बेकायदेशीर कृत्यांसाठी आहे का ? अशी विचारणाही करणार, असे तक्रारदार भगवान हरमलकर यांनी सांगितले.

Related Stories

दूधसागर पर्यटन हंगामाला औपचारिक सुरुवात

Amit Kulkarni

केंद्राकडून मिळणाऱया अनुदानात 22 टक्क्यांनी घट

Amit Kulkarni

प्रत्येक पिढीला चित्रपट प्रेरणा देतात

Amit Kulkarni

भाजप सरकारने सर्वसामान्यांबरोबर कार्यकर्त्यांचाही विचार केलेला नाही

Amit Kulkarni

बाबरेश्वर देवस्थान ट्रस्टचा जत्रोत्सव प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Patil_p
error: Content is protected !!