नवी दिल्ली : ग्रीसमधील कॅलीथिया येथे सुरू असलेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकरने पुरूषांच्या लांब उडीत सुवर्णपदक पटकाविताना 8.31 मी. चे अंतर नोंदविले.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेला मुरली श्रीशंकर हा सध्याचा लांब उडी प्रकारातील राष्ट्रीय विक्रमवीर आहे. गेल्या महिन्यात त्याने या क्रीडाप्रकारात 8.36 मी.चा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ग्रीसमधील स्पर्धेत श्रीशंकरने 8.31 मी.चे अंतर नेंदवित सुवर्णपदक मिळविले. स्वीडनच्या माँटेरने 8.27 मी.चे अंतर नोंदवित रौप्यपदक तर फ्रान्सच्या जुलेस पॉमेरीने 8.17 मी.चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले.