प्रतिनिधी / बेळगाव
किरकोळ अपघातानंतर वादावादी होवून ऑटोगॅरेज चालविणाऱया मेकॅनिकचा भीषण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री जुन्या पी. बी. रोडवर ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
महेश ज्ञानेश्वर कामाण्णाचे (वय 35, रा. विजयनगर, हलगा) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहा अज्ञातांविरूध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे.