बेळगाव प्रतिनिधी– कॅम्प येथील फिश मार्केटजवळ राहणार्या एका रहिवाशाचा खून झाला आहे. शनिवारी सकाळी घरात त्याचा मृतदेह आढळून आला असून हातापायावर व पोटावर तीष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत. सुरूवातीला नसा कापून घेऊन त्याने आत्महत्या केली की काय? असा संशय होता. दुपारी त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. सुधीर कांबळे (वय 54) असे त्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, उपनिरीक्षक बी. आर. डुग व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. विधीविज्ञान प्रयोग शाळेचे तज्ञ व ठसेतज्ञांनीहि घटनास्थळी तपासणी केली. हा प्रकार आत्महत्येचा नसून त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्याच घरात सुधीरचा खून कोणी केला? याची चौकशी करण्यात येत आहे.
Previous Articleगुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे
Next Article ‘महापालिका’ की ‘देवस्थान’ यातच तुंबले गटारीचे काम