Tarun Bharat

सावंतवाडी नजीकच्या गावातील महिलेचा गोव्यात खून

Advertisements

बांद्यातील युवकाला अटक

सावंतवाडी/प्रतिनिधी-

गोवा हरमल- खालचावाडा येथील हॉटेलमध्ये सावंतवाडी शहरानजीकच्या गावातील विवाहित महिला मृतावस्थेत आढळली. या महिलेचा रेटॉल प्यायला देऊन खून केल्याचा संशय गोवा पोलीसांना आहे गोवा पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून बांद्यातील युवकाला ताब्यात घेतले आहे. ९ मे रोजी हा २५ वर्षीय युवक ३० वर्षीय महिलेला घेऊन हॉटेलमध्ये आला होता. महिलेच्या ओळख पत्रावर सावंतवाडी येथील पत्ता होता. या महिला व युवकाकडे ओळखपत्र मागितले असता युवकाने २ दिवसात ओळखपत्र देण्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडे मान्य केले.


हा युवक १३ मे रोजी हॉटेलमधून रूमला कुलूप लावून निघून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट झाले. मात्र त्याच्या सोबत सदर महिला नव्हती. १६ मे रोजी बंद खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने रूमबॉयने हॉटेल व्यवस्थापनाला कल्पना दिली. पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. महिला रूममध्ये मृतावस्थेत आढळली . गोवा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. महिलेला रेटॉल देऊन खून केल्याचा संशय गोवा पोलिसांना असून त्यांनी बांद्यातून युवकाला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.


सदर महिला सावंतवाडी नजीकच्या गावातील असून १७ मे रोजी सायंकाळी तिच्यावर सावंतवाडी उपरालंकार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांच्या नावाचा प्रस्ताव

Patil_p

मासे मिळत नसल्याने मच्छीमारी बोटी चार दिवस किनाऱयाला!

Patil_p

कोकण रेल्वे विद्युतीकरणाची महिनाभरात चाचणी

Patil_p

दापोलीत खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी

Patil_p

राज्यपाल कोश्यारी सिंधुदुर्गात दाखल

Anuja Kudatarkar

चिपळुणात 24 लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

Patil_p
error: Content is protected !!