नोकरानेच केला खून, आरोपीला अटक, दहशतवादी गटाने स्वीकारली जबाबदारी
श्रीनगर / वृत्तसंस्था
मंगळवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या त्यांचाच नोकर असलेल्या यासीर याने केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीसह आणखी एकाला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. या हत्येची जबाबदारी ‘पीपल्स अँटीफॅसिस्ठ प्रंट’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची माहिती देण्यात आली आहे.
या हत्येनंतर या इस्लामी दहशतवादी संघटनेने एक ध्वनीफित प्रसिद्ध केली असून आम्ही कोणत्याही क्षणी, केठेही आणि कोणावरही असे जीवघेणे हल्ले करु शकतो, असे या ध्वनिफीतीत सांगण्यात आले आहे. या फीतीचीही चौकशी सुरु करण्यात आली असून लवकरच या कारस्थानाचा पर्दाफाश होईल, असा विश्वास तपास संस्था आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मित्राच्या घरात हत्या
ज्या घरात ही हत्या झाली ते घर लोहिया यांचे मित्र संजीव खजूरिया यांचे आहे. दोघांमध्येही कौटुंबिक संबंध होते. लोहिया सोमवारी संध्याकाळी आपल्या शासकीय संरक्षण यंत्रणेसह येथे आले होते. लोहिया यांनी रात्री जेवण केले आणि नंतर ते विश्रांती घेत होते. यावेळी या घरात दोन नोकर होते. त्यांची नावे यासीर आणि मोहिंदर अशी आहेत. यापैकी यासीर याला लोहिया यांनी आपले पाय चेपून देण्यात सांगितले होते. काही वेळाने बाहेर बसलेल्या मोहिंदर याला लोहिया यांची किंकाळी ऐकू आली. त्याने बाहेरुन पाहिले तेव्हा तेथे आग लागली होती.
तक्क्याने श्वास रोखण्याचा प्रयत्न
झोपण्याच्या पंलगावर असलेला तक्क्याने लोहिया यांचे तोंड दाबून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न यासीर याने केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नंतर त्याने बाजूला असलेली सॉसची बाटली फोडून फुटलेल्या बाटलीने लोहिया यांचा कळा चिरण्याचाही प्रयत्न केला. नंतर त्यानेच खोलीला आग लावली असावी असे अनुमान आहे. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. पण तो पर्यंत लोहिया यांचा मृत्यू झालेला होता.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दृष्य
हत्या केल्यानंतर यासीर तेथून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर रात्रभर शोध घेतल्यानंतर यासीर याला अटक करण्यात आली. त्याच्या एका सहकाऱयालाही अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या फूटेजमध्ये अन्यही काही दृष्ये असून त्यांचा अभ्यास सुरु आहे.
हिंदुत्ववादी शासनाला धमकी
या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱया पीएएफएफ या संघटनेने हिंदुत्ववादी लोक, शासन आणि हिंदुत्ववादी नेत्यांना धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रवक्ता तन्वीर अहमद याने ही धमकी दिली असून लोहिया यांची हत्या ही केवळ सुरवात असल्याचे म्हटले आहे. अशा हत्या आम्ही कोठेही आणि कोणाच्याही तसेच केव्हाही करु शकतो अशी फुशारकी त्याने मारली आहे. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही, असे प्रत्युत्तर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी दिले आहे. आता केंद्र सरकारही या संघटनेचा तपास करणार असून तिची पाळेमुळे खणून काढण्याचा निर्धार तपास संस्थानी केल्याचे प्रतिपादन मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले.
नवी दशहतवादी संघटना उदयास
ड नवी दहशतवादी संघटना पीआयएफएफ कडून हल्ल्याची जबाबदारी
ड संघटनेची हिंदुत्ववादी संघटनांना धमकी, कोणाचीही हत्या करणे शक्य