Tarun Bharat

उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त टिप्पणीचे समर्थन केल्याने राजस्थानच्या उदयपूरमध्ये एकाची गळा चिरून हत्या (murder) करण्यात आली होती. तसेच अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (५४) यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर कोल्हे यांची हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप होत होता. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचे आता अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला.

ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती पोलिसांना तब्बल अकरा दिवसांचा कालावधी लागला. एनआयएची टीम अमरावती शहरात दाखल होऊन दोन दिवस त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतरच अमरावती पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत भाष्य केले. याप्रकरणात आतापर्यंत अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिसांनी सहा संशयितांना अटक (arrested) केली आहे.

Related Stories

हद्दवाढीच्या चक्रव्युहात काँग्रेस!

Archana Banage

कोल्हापूर : पावसाअभावी पेरणी पिके करपली

Archana Banage

जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्यभिषेक दिन शाही पद्धतीने साजरा

Patil_p

‘ट्रेंड्स इन एज्युकेशन’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

Tousif Mujawar

लॉटरीच्या आमिषाने महिलेला सतरा लाखांचा गंडा

Patil_p

अखेर ‘तो’ शब्दही घेतला मागे;तानाजी सावंतांना अजित पवारांनी सुनावलं

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!