Tarun Bharat

मौजे वडगावात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपीस २९ पर्यंत पोलीस कोठडी

पुलाची शिरोली/वार्ताहर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी कविता चंद्रकांत कोरवी हिचा गळ्यावर, पाठीवर आणि पोटावर विळयाने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी मौजे वडगाव येथे घडली होती.या बाबत संशयित आरोपी चंद्रकांत कोरवी यास शिरोली एमआयडीसी पोलीसांनी अटक करुन गुरुवारी पेठ वडगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवार दिनांक २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील चंद्रकांत किसन कोरवी व पत्नी कविता कोरवी हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी दोन वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. बुधवारी कविता या अन्य महिलांच्या बरोबर बारबाही नावाच्या परिसरातील चौगुले यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी दीडच्या दरम्यान पती चंद्रकांत हा चौगुले यांच्या शेतात जाऊन पत्नीला घेऊन घरी येत होता. सुतार पाणंद रस्त्यावरुन घरी येत असताना चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. यामध्ये चंद्रकांत याने आपल्या हातातील विळ्याने पत्नी कविता हिच्या गळा, पाठ आणि पोट यावर सपासप वार करून खून केला. तिच्या मृतदेहावर कापड झाकून घटनास्थळी सायकल तिथेच टाकून तो हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यांनतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले होते. गुरुवारी त्याला पेटवडगाव येथील न्यायालयात हजर केले असता. मंगळवार दिनांक २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत.

Related Stories

देशाच्या विकासात शेती क्षेत्राबरोबरच ट्रॅक्टरच्या माध्यमातून वितरकांचा हातभार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : माजगाव पुलावर पाणी, वाहतूक अन्यत्र वळवली

Archana Banage

गोकुळ शिरगाव येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; 4 जण कोरोनामुक्त

Archana Banage

संभाजीराजे छत्रपतींच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष; राजकीय घडामोडींवर नेमके काय बोलणार?

Archana Banage

रक्षा विसर्जन पुन्हा जुन्या वळणावर…

Kalyani Amanagi