Tarun Bharat

बहिणीशी प्रेम संबंधाच्या संशयावरून पाडगावच्या युवकाचा खून

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

पाडेगाव ता. फलटण गावच्या हद्दीत शिवचा मळा येथे राहत्या घरासमोर अंगणात झोपलेला राहूल नारायण मोहिते(वय 31) यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. खूनाच्या तीन महिन्यानंतर पाच आरोपींना जेरबंद करण्यास लोणंद पोलिसांना यश आले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. प्रकाश उर्फ अजित किसन गोवेकर, योगेश श्रीरंग मदने( दोघे रा. कोरेगाव), दत्ता मारूती सरक, गणेश बापु कडाळे(दोघे रा. पाडेगाव) अशी संशयिताची नावे आहेत. संशयित गणेश कडाळे यांच्या बहिणीशी राहूल मोहितेचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

यावेळी पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले, गेले तीन महिन्यापासून उघडकीस न आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट देवून मार्गदर्शन केले. तीन महिन्यापासून गुह्यातील आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत होते. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व पोलीस कर्मचाऱयांनी अनेक बाजू तपासून पाहिल्या. यावेळी त्यांना गोपनिय माहिती मिळत गेली. या संशयितापैकी पाडेगावात राहत असलेला गणेश कडाळे यांची बहिण आणि मयत राहूल यांच्या प्रेम संबंध असल्याचा संशय त्याला होता. या संशयावरून त्याने राहूलचा खून करण्याचा कट रचला. राहूल हा अंगात झोपत असल्याची माहिती त्याला होती.  यांचा फायदा घेत मंगळवार दि. 10 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या पुर्वी प्रकाश उर्फ अजित किसन गोवेकर, योगेश श्रीरंग मदन, दत्ता मारूती सरक, गणेश बापु कडाळे व अल्पवयीन मुलगा हे अंगणात आले. यावेळी दोघांनी हात पाय धरले तर एकाने गळा चिरून त्याचा खून केला आणि निघून गेले. यांना ताब्यात घेतल्यावर यांनी खूनाची कबुली दिली आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे.  

आईवडीलांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट  

तीन महिने उलटूनही मुलाचे मारेकरी सापडत नसल्याने मयत राहूलचे आई-वडीलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, लवकरच आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी त्यांना दिला. त्याच रात्री हा खून उघडकीस आणण्यास लोणंद पोलिसांना यश आले.  

Related Stories

पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Amit Kulkarni

ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्तांना लसीकरण सुरू

Abhijeet Shinde

प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये

Abhijeet Shinde

गडहिंग्लज कोविड केअर सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात ‘म्युकर मायकोसिस’चा धोका वाढला

Abhijeet Shinde

सातारा : मार्चअखेर पालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील

datta jadhav
error: Content is protected !!