Tarun Bharat

मुरगाव पालिकेने मांगोहिलमधील विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवली, माल व साहित्यही जप्त

प्रतिनिधी /वास्को

मुरगाव पालिकेने शुक्रवारी मांगोरहिल भागातील दोन प्रमुख नाक्यावरील व्यवसायीक अतिक्रमणे हटवली. या कारवाईत फळ विक्रेत्यांचा माल व साहित्यही जप्त करण्यात आले. पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कामगीरी चालूच राहणार असल्याचे मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.

   मुरगाव पालिकेने सध्या शहर व परीसरातील रस्त्याच्याकडेला असलेली विक्रेत्यांची अतिक्रमणे हटवण्याची धडक कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईत मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स व त्यांचे नगरसेवक जातीने लक्ष घालीत आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उपस्थितीतच ही कारवाई होते. दोन दिवसांपूर्वी वास्को शहरातील नवीन भाजी मार्केटमधील अतिक्रमणे धडक कारवाईत हटवून पालिकेने या मार्पेटमधील रस्ता साफ केला होता. त्यानंतर काल शुक्रवारी पालिकेने मांगोरहिलच्या दोन्ही प्रमुख नाक्यावरील अतिक्रमणे हटवली. मांगोरहिलचा दुरध्वनी केंद्रासमोरील नाका तसेच वरूणापुरी नाक्यावर फळ विक्रेत्यांची बरीच अतिक्रमणे होती. ती पालिकेने हटवली. यापूर्वीही पालिकेने या विक्रेत्यांविरूध्द कारवाई केली होती. परंतु पुन्हा पुन्हा हे विक्रेते त्या ठिकाणीच ठाण मांडीत होते. वरूणापुरीतील नाक्यावर कच्चे साहित्य वापरून बऱयाच विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. अशाच प्रकारचा आसरा उभा करून या दुकांनांच्या मागे जुगारी धंदेही चालत होते. अशाच प्रकारची कारवाई शहर परिसरातील अतिक्रमणांवरही करण्यात येणार असल्याचे मुरगावच्या नगराध्यक्षांनी म्हटले आहे.

Related Stories

कुडचडेवासियांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय हवा : फर्नांडिस

Amit Kulkarni

खोल येथे ‘आमदार तुमच्या दारी’चा दुसरा टप्पा

Amit Kulkarni

नितीश बेलुरकरला अ. गो. ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद

Amit Kulkarni

श्रावणमासानिमित होंडा आजोबा कळसापेड देवस्थानात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Amit Kulkarni

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni

काँग्रेसचे सरकार घडवा

Amit Kulkarni