Tarun Bharat

मुरघा मठाधीशांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ बेंगळूर

लैंगिक शोषणाच्या आरोपावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने गुरुवारी रात्री मुरुघा मठाधीश डॉ. शिवमूर्ती स्वामीजींना अटक करण्यात आली होती. गुरुवारी रात्रीच त्यांनी दाखल केलेली जामीन याचिका न्यायाधीशांनी फेटाळून लावत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. शुक्रवारी पोलिसांनी स्वामीजींची चौकशी करण्यासाठी त्यांना आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने स्वामीजींना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

चित्रदुर्ग मुरुघा मठाधीश डॉ. शिवमूर्ती स्वामीजींवर मठातर्फे चालविण्यात येणाऱया  वसतिगृहातील दोन विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी स्वामीजींसह पाच जणांविरुद्ध म्हैसूरमध्ये पोलिसांत तक्रार केली होती. नंतर हे प्रकरण चित्रदुर्ग जिल्हा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा चित्रदुर्ग पोलिसांनी स्वामीजींना अटक केली. नंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. यावेळी स्वामीजींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायाधीशांनी तो फेटाळून लावत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. शिवमूर्ती स्वामीजींना शुक्रवारी सकाळी जिल्हा कारागृहात नेण्यात आले. काही वेळातच त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुक्रवारी पोलिसांनी स्वामीजींची चौकशी करणे आवश्यक आहे. कथित गुन्हा झालेला परिसर सील करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वामीजींना 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती द्वितीय अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे केली. त्यावेळी स्वामीजींना न्यायालयात हजर करा, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना केली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता स्वामीजींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने स्वामीजींना 4 दिवसांसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. आवश्यकता भासली तर त्यांना तेथेच वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, असा आदेश दिला.

स्वामीजी इस्पितळात दाखल

शुक्रवारी सकाळी स्वामीजींना चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात नेण्यात आल्यानंतर त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांची तब्येत ढासळली. त्यामुळे स्वामीजींना तातडीने जिल्हा इस्पितळातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच भाविकांनी इस्पितळाबाहेर गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. अनुचित घटना घडू नयेत यासाठी मुरघा मठ आणि जिल्हा इस्पितळाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related Stories

‘काळी जादु’ करून कॉंग्रेस आपला पक्ष वाचवू शकत नाही- पंतप्रधान मोदी

Abhijeet Khandekar

साखर निर्यातीवर 1 जूनपासून बंदी

Patil_p

आता २ ते ६ वर्षांच्या मुलांनाही मिळणार कोरोना लस

Archana Banage

सिरमच्या लसीची किंमत जवळपास अडीचशे रुपये

Patil_p

दोन काँगेस आमदारांवर ईडीची धाड

Patil_p

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

Tousif Mujawar