Tarun Bharat

मुसेवाला हत्या प्रकरणातील शार्पशूटर संतोष जाधवला गुजरातमधून अटक

Advertisements

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील वॉन्टेड संशयित संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरामधून अटक केली आहे. त्याला आश्रय देणारा नवनाथ सुर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यांची मुसेवाला खून प्रकरणात काय भूमिका आहे, या टोळीच्या कसे संपर्कात आले, याचा तपास केला जाणार आहे. त्याशिवाय अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीची माहिती संबंधितांना होती, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत कुमार सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संतोष सुनील जाधव (वय २७, रा पोखरी आंबेगाव सध्या रा. मंचर) आणि नवनाथ सुरेश सुर्यवंशी ( वय २८, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भुज, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सराईत संतोष जाधव याने साथिदारांसह ओंकार ऊर्फ राण्या आण्णासाहेब बाणखेले याच्यावर गोळीबार करून खुन केल्याची घटना २०२१ मध्ये घडली होती. याप्रकरणी तो फरार झाल्यानंतर पोलीस शोध घेत होते. दरम्यान, गायक मुसेवाला हत्याकांड प्रकरणात त्यांचे नाव असल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह तीन पोलीस पथके जाधवसह इतर आरोपींच्या शोधात होती. मागील आठवड्यात पथकाने सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल (रा. नारायणगाव ता जुन्नर) याला अटक केली होती. चौकशीत त्याने संतोष गुजरातमधील कच्छमध्ये मित्राकडे राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने गुजरामध्ये जाउन नवनाथ सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संतोषला नागोर गावात ओळखीच्या ठिकाणी राहण्याची सोय केल्याचे सांगितले. पथकाने सापळा रचून त्यालाही अटक केली.

Related Stories

नगरमध्ये तोतया कमांडोला अटक

datta jadhav

मंत्रीपद विस्ताराबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

Abhijeet Shinde

सातारा : निसराळे चाकूहल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, चार संशयित अटक

Abhijeet Shinde

फिरताना हटकल्याच्या रागातून पोलीस शिपायाला बेदम मारहाण

datta jadhav

लोकशाही व शिक्षणाच्या माध्यमातून समाजबदल हा डॉ.आंबेडकरांचा विचार

Rohan_P

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!