भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांचे गौरवोद्गार : स्नेहसंमेलन-बक्षीत वितरण सोहळा उत्साहात
पणजी : ‘मुष्टिफंड संस्था ही गोव्यातील अत्यंत नामवंत, विश्वासार्ह अशी जूनी संस्था असून केवळ शिक्षणाकरीता समर्पितपणे कार्य करणाऱया श्रेष्ठ व्यक्तीमुळे ही संस्था गोमंतकात समाजमान्य व प्रतिष्ठा लाभलेली अशी संस्था आहे, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष तथा इडीसीचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले.
मुस्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठय़ा उत्सहाने संपन्न झाले. प्रमुख अतिथींच्या रूपाने तानावडे यांनी वरील प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल खंवटे, सचिव सुहास सरदेसाई, खजिनदार दिलीप धारवाडकर, जयराम खोलकर, पालक-शिक्षक संघटनेची अध्यक्षा गीतालक्ष्मी, विद्यालयाचे प्रार्चा नवनाथ परूळेकर, विद्यालयाची वरिष्ठ शिक्षिक सुचेता नाईक तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची प्रमुख कु.,अलंकृती नाईक उपस्थित होते.
विद्यालयाची वरिष्ठ शिक्षिका सुचेता नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रमुख पाहुण्यांना, जयराम खोलकर यांच्या हस्ते फळांची टोपली देऊन स्वागत केले. तसेच मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचेही स्वागत पेले. अनिल खंवटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेतर्फे कार्यरत असलेल्या विकासात्मक कार्याचा आढावा घेऊन कुजिरा शिक्षण संकुलाच्या प्रगती करीता सत्ताधारी पक्षाने सहकार्य करावे असे आव्हान केले.
प्राचार्याकडून अहवाल सादर
प्राचार्य नवनाथ परूळेकरांनी 2021-2022 सालात विद्यालय व विद्यालयीन अंतर्गत संपन्न झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन वार्षिक अहवाल वाचन केले. 2019 ते 2020 , 2020 ते 2021 या साली कोविड काळामुळे, संस्थेतर्फे दिल्या जाणाऱया विविध पारितोषिक, वितरण सोहळा संपन्न न झाल्यामुळे या प्रसंगाचे औचित्य साधून 2019 ते 2020, 2020 ते 2021 तसेच 2021 ते 2022 या सालाचे, विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून त्याचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान
2021-2022 सालाकरीता संस्थेतर्फे दिले जाणारे ‘श्री दिलीप कैसरे तसेच स्वर्गीय श्रीमती उमाबाई कैसरे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे ‘अष्टपैलू विद्यार्थी’ म्हणून कु. साईराज जयंत नाईक या विद्यार्थ्यांला भूषविले तसेच माधव भिडे स्मरणार्थ संजय कैसरे आणि संस्थेचे सचिव सुहास सरदेसाई यांनी पुरस्कृत केलेले ‘अष्टपैलू विद्यार्थीनी’ म्हणून कु. दिक्षा देवेंद्र नाईक हिला भूषविण्यात आले.
संस्थेतर्फे श्रीगणेशाची मूर्ती दिलीप धारवाडकरांच्या हस्ते सदानंद शेट तनावडे यांना प्रदान करण्यात आली. तसेच संस्थेचा प्राचिन इतिहासाची गौरवशाली गाथ सांगणारे ‘मुठभर तादळाची कहाणी प्रस्तुत गंथ भेटरूपी सुहास सरदेसाई यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना प्रदान करण्यात आला. कु. अलंकृती नाईक यांनी आभार प्रकट केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन सौ. सोनाली नार्वेकर यांनी केले तर पारितोषिक वितरणाचे सुत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक सचिन सबनिस, सौ. सारिका सरदेसाई व सौ. शारदा परब यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.