प्रतिनिधी/ बेळगाव
संगीत कलाकार संघाची जून महिन्याची बैठक मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. या बैठकीत बी. व्ही. कडलास्कर बुवांचे शिष्य गुऊराज कुलकर्णी तसेच युवा शिष्य राज बिच्चू यांचे शास्त्राrय गायन होणार आहे.
गुऊराज कुलकर्णी संगीत विद्वत उत्तीर्ण असून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. संगीत परीक्षक म्हणूनही ते काम करतात. त्यांना संवादिनीवर मुकुंद गोरे व तबल्यावर विशाल मोडक साथ करणार आहेत.
राज बिच्चू रोहिणी कुलकर्णी यांचे शिष्य असून त्यांनी सारंग कुलकर्णी यांच्याकडून संवादिनी वादनाचे शिक्षण घेतले आहे. त्यांना नेहा आणि केतकी ताम्हणकर, अनुक्रमे संवादिनी व तबल्याची साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे संघाने कळविले आहे.