प्रतिनिधी /बेळगाव
गुरुप्रसादनगर येथील सप्तसूर संगीत विद्यालयातर्फे पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दि. 31 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठाजवळील आयएमईआर सभागृहामध्ये संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मूळचे बेळगावचे व सध्या मुंबई येथील रहिवासी महेश कुलकर्णी, बेळगावच्या निर्मला प्रकाश अय्यर तसेच राजप्रभू धोत्रे हे कलाकार शास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना तबला साथ नारायण गणाचारी व अंगद देसाई देतील. वामन वागूकर व निरंजन मूर्ती हे संवादिनी साथ देतील.
गुरुवंदना कार्यक्रम
याच दिवशी सकाळी 9.30 ते 4 या वेळेत सप्तसूर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. तरी सर्व संगीतप्रेमी मंडळींनी याचा आनंद घ्यावा.
‘संगीत परिचय’ पुस्तकाचे प्रकाशन
कार्यक्रमाचे औचित्य साधून निर्मला प्रकाश यांनी लिहिलेल्या, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या प्रारंभिक व प्रवेशिका प्रथम या अभ्यासक्रमावर आधारित ‘संगीत परिचय’ पुस्तकाचे पं. नंदन हेर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.