तंतुवाद्यांसह निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूचे पूर्वीप्रमाणेच वजन मोजून, त्यावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहेत. अशी माहिती भारतीय पोस्ट खात्याच्या महासंचालकांनी दिली.
यामुळे भारतीय तंतूवाद्य निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी आकारमानाच्या आधारावर निर्यात शुल्क आकारण्यात येत होते. या निर्णयामुळे भारतीय तंतुवाद्य निर्मात्यांचा व्यवसाय जवळजवळ ८० टक्क्यांनी कमी झाला. आता मात्र पूर्वीप्रमाणेच वजन मोजून निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.