Tarun Bharat

मस्क यांनी ‘टेस्ला’चे 79 लाख समभाग विकले

Advertisements

ट्विटरसोबत व्यवहार रद्द झाला किंवा इक्विटी भागीदार सोबत नाही आले तर यासाठी तयारी ः मस्क यांची माहिती

नवी दिल्ली

 जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये अव्वलस्थानी असणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणारी कंपनी टेस्ला यांचे जवळपास 6.9 अब्ज डॉलर (साधारण 54 हजार कोटी रुपये) इतक्या समभगांची विक्री केली आहे. ही विक्री करण्याचे कारण म्हणजे 44 अब्ज डॉलर (3.4 लाख कोटी रुपये) इतक्या रक्कमेत ट्विटरचा व्यवहार होण्याचे संकेत आहेत.

मस्क यांनी यावेळी म्हटले आहे, की काही कारणास्तव ट्विटरसोबत व्यवहार रद्द झाला किंवा काही इक्विटी भागीदार सोबत नाही आले, तर रोख व्यवहार करावा लागू शकतो यासाठीच अचानकपणे हे समभाग विकले असल्याची माहिती यावेळी मस्क यांनी दिली आहे.

या अगोदर मस्क यांनी एप्रिल महिन्यात 8.5 अब्ज डॉलर (जवळपास 67 हजार कोटी रुपये) इतके समभाग विकले होते. तेव्हा समभाग विक्रीचा कोणताही प्लॅन नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र नव्या फाइलिंगनुसार 5 ते 9 ऑगस्टदरम्यान टेस्लाचे साधारणपणे 79.2 लाख समभाग विकले आहेत. आता कंपनीजवळ 15.5 कोटी इतके समभाग शिल्लक राहिले आहेत.

10 महिन्यात 32 अब्ज डॉलर समभाग विक्री

मस्क यांनी मागील 10 महिन्यामध्ये टेस्लाचे जवळपास 32 अब्ज डॉलरच्या समभागांची विक्री केली आहे. यामध्ये मंगळवारच्या सत्रात टेस्लाचे समभाग हे 21.27 डॉलर म्हणजे 2.44  टक्क्यांनी घसरुन 850 डॉलरवर बंद झाले आहेत.

Related Stories

एलऍण्डटी कंपनीला चेन्नई मेट्रोचे मिळाले कंत्राट

Patil_p

ओएनजीसीला विक्रमी नफा

Patil_p

‘इन्फोव्हिजन’ची 2,000 इंजिनिअर नियुक्त करण्याची योजना

Patil_p

जीडीपी 10.5 टक्के राहणार : ब्रिकवर्क

Amit Kulkarni

कोरोनाच्या संकट काळात वाहन क्षेत्राच्या विक्रीत सुधारणा

Omkar B

आकाश एअरची विमानसेवा जूनपासून

Patil_p
error: Content is protected !!