Tarun Bharat

Sangli : बनावट दस्त करून जमिनीची परस्पर विक्री; संशयित ९ जण अद्याप फरार

Advertisements

इस्लामपूर : बनावट दस्त करून १२ गुंठे जमिनीची २५ लाख रुपयांना परस्पर विक्री केलेल्या प्रकरणातील संशयित ९ जण अद्याप फरारी आहेत. मंडलाधिकारी, तलाठी, स्टॅम्प व्हेंडर यांच्यासह १० जणांवर फसवणूक आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी विजय पाखरे ( रा. इस्लामपूर, सध्या रा. शेरे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली होती.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधारविजय संभाजी जाधव याच्यासह सुजित थोरात, निलेश बडेकर, अरुण गवळी, सोमनाथ माने, कुलदीप जाधव, किर्तीकुमार पाटील, तलाठी विठ्ठल कांबळे, मंडलाधिकारी संभाजी हांगे, स्टॅम्प व्हेंडर सुरेश सावंत या संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. निलेश बडेकर याला अटक करण्यात आली असून त्याची न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विजय पाखरे यांच्या परस्पर विजय जाधव व निलेश बडेकर यांनी १२ गुंठ्याचा बनावट दस्त तयार केला. तलाठी कांबळे यांनी दस्ताची नोंद केली. तर मंडलाधिकारी हांगे यांनी ही नोंद मंजूर केली होती. त्यानंतर १२ गुंठे जमीन जाधव याने सुजित थोरात याला विकली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विजय पाखरे यांनी या प्रकरणातील संशयितांविरोधात फसवणूक व अॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बडेकर याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास विटा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम करीत आहेत.

Related Stories

आबांच्या पत्नीमुळे वाचले दोघा अपघातग्रस्तांचे प्राण

Archana Banage

सांगली : मिरज कोविड रुग्णालयातील तीन कर्मचारी कोरोना बाधित

Archana Banage

सांगली : ९० वर्षांच्या आज्जींना मंत्री जयंत पाटील यांनी दिला धीर

Archana Banage

कर्नाटकात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटीपीसीआर बंधनकारक

Archana Banage

‘नो मास्क, नो एन्ट्री’ मोहिम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी

Archana Banage

Sangli : संजयनगर परिसरात गढूळ पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!