Tarun Bharat

मुरुगेंद्रगौडा पाटील क्रिकेट स्पर्धा जानेवारीत

बेळगाव टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित मुरुगेंद्रगौडा पाटील बेळगाव टेनिस बॉल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लवडेल सेंट्रल स्कूलच्या टर्फ मैदानावर होणार आहे.

सदर स्पर्धा बीजेपी महानगर जनरल सेक्रेटरी व एमपी फाउंडेशनचे संस्थापक ऍड मुरुगेंद्रगौडा पाटील यांनी पुरस्कृत केली आहे. बेळगावात प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या या टेनिस बॉल प्रीमियर लीग स्पर्धेत 12 संघांचा सहभाग राहणार असून स्पर्धेतील सामने दिवस-रात्रीचे खेळविण्यात येणार आहेत. सहभागी 12 संघांमध्ये बेळगावच्या क्रिकेटपटूंचा लिलाव होणार असून या लिलावाद्वारे सर्व संघ निवडण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने प्रत्येकी 10 षटकांचे होणार असून स्पर्धेतील संघ रंगीबेरंगी पोशाखात खेळणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने राऊंड रॉबिन लीग पद्धतीने होणार आहेत.

दरम्यान एका छोटेखानी कार्यक्रमात स्पर्धा पुरस्कर्ते मुरुगेंद्रगौडा पाटील यांचा आयोजकांतर्फे मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भैरेगौडा पाटील, स्पर्धा संयोजक परशराम पाटील, सचिन साळुंखे, प्रसाद नाकाडी, संदीप चव्हाण, यतीन्द्र देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

अथणी तालुक्यात आणखी 11 पॉझिटिव्ह

Patil_p

…अन्यथा रुमेवाडी नाका महामार्गावर वृक्षारोपण

Omkar B

हिरेहट्टीहोळीतील पूरग्रस्तांचे ठिय्या आंदोलन

Omkar B

वेटलिफ्टर अक्षता कामतीला खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण

Amit Kulkarni

पोलिसांनीही केले नववर्षाचे स्वागत

Amit Kulkarni

कुत्री मोकाट, मुलांचा जीव धोक्यात

Amit Kulkarni