Tarun Bharat

दादागिरी खपवून घेणार नाही; माझ्या पक्षाचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पण, शिवसैनिकांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य करत बंडखोर शिंदेंच्या भूमिकेला रामदास आठवले यांनी एकप्रकारे समर्थन दिले आहे. 

आठवले यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आठवले यांना माध्यमांनी गाठले. आठवले म्हणाले, शिंदे यांचे बंड हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होताना दिसतात. मात्र, शिवसैनिकांची दादागिरी आम्ही खपवून घेतली जाणार नाही. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आठवले यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं वक्तव्य केलं होतं. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मी भेटून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून सत्ता स्थापन करा असं सांगणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज आठवले यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आले नाही.

Related Stories

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विसाव्या ऊस परिषदेला उत्साहात प्रारंभ

Archana Banage

श्रावण घाटीजवळ चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा अपघात

Anuja Kudatarkar

खर्गे आहे त्या परिस्थितीचे नेर्तृत्व करतात माझी उमेदवारी नवीन बदलासाठी- खास. शशी थरूर

Abhijeet Khandekar

सांगली जिल्हय़ात आज नवे ११२ रूग्ण तर दोन मृत्यू

Archana Banage

भात खाचर जलमय

Patil_p

महाराष्ट्र सरकारच्या मिशन ‘ब्रेक द चेंज’ आदेशात सुधारणा

Tousif Mujawar