Tarun Bharat

माझा दुसरा गुरुही गेला; शरद पोंक्षेंनी व्यक्त केल्या हृद्यभावना

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते शरद पोंक्षे शोक व्यक्त करताना म्हणाले, माझ्या आयुष्यातला फार मोठा आधार गेला. ज्यांच्याकडे बघत मी अभिनय शिकलो. या क्षेत्रात कसे वागावे हे शिकलो. आपल्या मतांवर ठाम कसे राहावे हे शिकलो. असा माझा सर्वच बाबतीतला तो गुरू होता.

माझ्या आजारपणात भेटायला येऊन मला आधार देऊन गेले. काही दिवसांपूर्वी माझ्याच बाजूच्या सेट वर शुटींग करत होते. जायचे प्रत्येकालाच आहे, परंतु एक छान कारकीर्द करून जावे. दु:ख तर खूप आहेच. खऱ्या अर्थाने रंगभूमीवरचा केवळ दिसायला च नाहीतर अभिनयातही देखणा कलाकार गेला. स्टेजवर कसे काम करावे, कसे बोलावे, कसे वावरावे हे शिकवणारा अफाट अभिनेता होता तो. माझ्या आयुष्यातली ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे. माझा पहिला गुरू यशवंत दत्त गेला आणि हा दुसरा गुरूही गेला.

Related Stories

‘सिंघम 3’मध्ये दीपिका साकारणार भूमिका

Patil_p

पुराच्या पाण्यासमोरच नवदाम्पत्याचे फोटोशूट

Amit Kulkarni

सेलिब्रिटी कपल्स रंगणार व्हॅलेंटाईन-डे मध्ये

Patil_p

सेलिब्रेटिंनी ‘फादर्स डे’निमित्त सोशल मिडियावर व्यक्त केल्या भावना

Abhijeet Khandekar

आषाढी एकादशीनिमित्त सावनीचे ऑनलाईन कॉन्सर्ट

Patil_p

प्रिया, उमेशचे नाते नवीन टप्प्यावर

Patil_p