Tarun Bharat

बागेवाडी फाट्याजवळ तीन गाड्यांचा अपघात ;एक वयोवृद्ध ठार, पत्नी गंभीर जखमी

जत, प्रतिनिधी

Sangli News : जत तालुक्यातील विजापूर -गुहागर राष्ट्रीय मार्गावर कुंभारी गावापासून जवळ बागेवाडी फाट्याजवळ तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 90 वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. गंगाराम बाळाप्पा जाधव ( रा. हुण्णुर ममदाबाद ता.मंगळवेढा सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. तर पत्नी गंभीर जखमी झाली. हे दोघे धावडवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नासाठी रविवारी आले होते.

लग्न समारंभ आटपून जेवण करुन परत आपल्या गावी जाण्यासाठी टेंपो मध्ये बसले होते. माघारी येत असताना टेंपो पलटी होऊन यामध्ये गंगाराम जाधव व पारुबाई जाधव हे दोन्ही वयस्कर दांपत्य गंभीर जखमी झाले. यात गंगाराम जाधव यांना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणतेवेळी वाटेतच मृत्यू झाला. तर पारुबाई जाधव या गंभीर जखमी असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेंपोला चुकविण्यासाठी झालेल्या अपघातात जीप, टमटम यांचाही अपघातांत समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

सांगली (इस्लामपूर) : विनाकारण फिरताय सावधान..

Archana Banage

शहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Archana Banage

नेर्ले येथे दोन ट्रकच्या अपघातात एक ठार

Archana Banage

शिराळा पोलिसांकडून एका महिन्यात दुसरी आंतरराज्य टोळी जेरबंद

Archana Banage

सांगली : खत दरवाढ निषेधार्थ राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करेल : जयंत पाटील

Archana Banage

सांगली : 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू

Archana Banage