प्रतिनिधी/ बेळगाव
उचगाव मळेकरणी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले एन. ओ. चौगुले यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ व नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आंतरराज्य गौरव पुरस्कार देण्यात आला. शनिवारी धर्मनाथ भवन येथे त्यांचा म्हैसुरी फेटा, हार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री, रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅ. अमरसिंग पाटील, पारनेरचे आमदार नीलेश लंके, होमगार्डचे कमांडन्ट अरविंद घटी, माजी महापौर राजू शिंगाडे उपस्थित होते.