वृत्तसंस्था /रोम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉपसीडेड राफेल नदाल आणि जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. नदालने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा 6-3, 6-1 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. नदालला विजयासाठी तब्बल 80 मिनिटे झगडावे लागले. नदालचा पुढील फेरीतील सामना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हशी होणार आहे. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने सेबेस्टियन बाएझचा 7-6 (8-6), 6-3 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना दीड तास चालला होता. गेल्या आठवडय़ात व्हेरेव्हला माद्रीद टेनिस स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्पेनच्या अलकॅरेझकडून पराभव पत्करावा लागला होता.