आगरतळा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱयावर दाखल झाले आहेत. या दौऱयात पक्षनेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये नड्डा पुढील वषी होणाऱया त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती बनवणार आहेत. त्यांनी आगरतळा येथील राज्य अतिथीगृहात भाजप त्रिपुरा कोअर कमिटीशी चर्चा केली. त्यानंतर आता सोमवारी ते उदयपूरला रवाना होतील. या यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान ते त्रिपुरा विद्यापीठाजवळील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळय़ांना पुष्पहार अर्पण करतील. तसेच उदयपूर येथील ऐतिहासिक माताबारी मंदिर येथे प्रार्थना करतील आणि मंगला आरतीमध्ये सहभागी होणार असल्याचे राज्य प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.