चित्रपटाचा टीझर आउट
दक्षिणेतील सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांचा आगामी चित्रपट ‘द घोस्ट’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. नागार्जुन यांनी स्वतः तेलगू चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. द घोस्ट हा चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या 49 सेकंदांच्या या टीझरमध्ये 62 वर्षीय नागार्जुन ऍक्शन अवतारात दिसून येत आहे. चित्रपटाच्या या टीझरला चाहत्यांची मोठी पसंती प्राप्त होत आहे. प्रवीण सत्तारू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. द घोस्ट या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान देखील आहे. जॅकलीन फर्नांडिसच्या जागी सोनलची या चित्रपटात वर्णी लागली आहे.
द घोस्टसह अक्किनेनी नागार्जुन हे अयान मुखर्जीचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र ः पार्ट 1’मध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नागार्जुन अत्यंत वेगळय़ा धाटणीच्या भूमिकेत दिसून येतील. ‘ब्रह्मास्त्र ः पार्ट 1’मधून आलिया भट्ट, रणवीर कपूर, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन यासारखे दिग्गज कलाकार देखील झळकणार आहेत.