प्रतिनिधी /पेडणे
विविध क्षेत्रात कार्यारत असलेले आणि गेली 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले वळपे विर्नोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे शिक्षण क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.या त्यांची कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश शिक्षक विभागाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून यावषी त्यांना राज्यशिक्षक पुरस्कार प्रदान केला.
या त्यांच्या यशाने हायस्कूलची कीर्ती वाढली आहे. त्यांच्या यशाबद्दल हायस्कूलचे चेअरमन कृष्णा परब, व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्यावतीने चेअरमन कृष्णा परब आणि शाळेचे जे÷ कर्मचारी अर्जुन परब यांनी मुख्याध्यापक नागेश गोसावी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना कृष्णा परब म्हणाले की, आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक नागेश गोसावी हे आपच्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्शील आणि कृतीशील असतात पुस्तकी ज्ञाना व्याक्तिरिक्त सामाजिक विषयाचे ज्ञान ते नेहमीच देत आहेत.त्यांच्या कार्याचि दखल घेऊन गोवा प्रदेश भाजप शिक्षण विभागाने त्यांचा जो गौरव केला त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे चेअरमन कृष्णा परब म्हणाले.
यावेळी बोलताना नागेश गोसावी म्हणाले की हा सत्कार हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या संस्थेचा आहे माझ्या शाळेचा आहे.आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो. यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे असे ते म्हणाले.