Tarun Bharat

नागोवात माजी उपसरपंच ऍड. दिलेश्वर नाईक यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी /वास्को

नागोवा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ऍड. दिलेश्वर नाईक यांची यंदा पंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ते सतत दुसऱयांदा विजयी झाले आहेत. नागोवातील ग्रामस्थांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर  अभिनंदन केले. मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स तसेच इतर नगरसेवकांनीही त्यांचे अभिनंदन केले.

ऍड. दिलेश्वर नाईक यांनी मागच्या निवडणुकीत कॅस्टलवाडो नागोवा येथील प्रभाग क्रमांक दोनमधून शंभर मतांच्या आघाडीने विजय मिळवला होता. या पंचायतीचे त्यांनी काही काळ उपसरपंचपदही भुषवीले. यंदा पुन्हा त्याच प्रभागातून ते निवडणुकीत उतरले होते. त्यांच्याविरूध्द एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. काल मंगळवारी त्यांच्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यांची नागोवा पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोनमधून पंच सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे मुरगावच्या निर्वाचन अधिकाऱयांनी जाहीर केले. नागोवातील आपल्या प्रभागातील जनतेने मागच्या दहा वर्षांपासूनच्या आपल्या समाजसेवेची दखल घेत बिनविरोध निवडून देऊन पोचपावती दिलेली असून आपण जनतेचा आभारी असल्याचे ऍड. दिलेश्वर नाईक यांनी म्हटले आहे.

Related Stories

पर्यटनाच्या सर्व गोष्टी खुल्या

Patil_p

ट्रक-व्हेगनार अपघातात दोघे जखमी

Amit Kulkarni

‘कोविड’च्या संकटात ‘दिल की आवाज सून’…

Patil_p

केपे सरकारी महाविद्यालयात मराठी टंकलेखन कार्यशाळा उत्साहात

Amit Kulkarni

पंचायत कर्मचाऱयांच्या आजपासून बदल्या

Patil_p

आसगावात झाडांची कत्तल करण्यास ग्रामस्थांचा विरोध

Patil_p