Tarun Bharat

सांगली : न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळामध्ये नागपंचमीचा उत्साह

Advertisements

कोरोनामुळे गेली दोन वर्ष कोणतेच सण-समारंभ साजरे झाले नाहीत. यंदा मात्र मोठ्या उत्साहात सर्वच सण साजरे होणार आहेत. आज नागपंचमीचा सण आहे. त्यातच शिराळ्याला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा येथे अनेक वर्षापासून आहे. शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा  नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच संसदेत केली होती. मात्र अजून न्यायालयाने य़ा संदर्भात तसा कोणताच आदेश दिलेला नाही. म्हणूनच न्यायालयाच्या आदेशानुसारच यंदा शिराळात नागपंचमी साजरी केली गेली.

याबाबत सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचवलं आहे, असे माने यांनी म्हंटले असलं, तरी जिवंत नागाची पूजा करावी असा निर्णय अजून दिला गेलेला नाही.त्यामुळे यंदाही न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळाकरांनी नागपंचमी साजरी केली.

Related Stories

खानापुरला आमदार अनिल बाबर यांच्याकडून ३ कोटी निधी

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाडमध्ये रिक्षा चालकास तिघांकडून बेदम मारहाण

Abhijeet Shinde

जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी वाकुर्डे योजनेच्या पाण्याचे पुजन

Abhijeet Shinde

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक – मंत्री विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

विश्रामबाग पोलिसांचा सत्कार

Abhijeet Shinde

रोजगार हमी व ग्रंथालय समितीवर आ. विक्रमसिंह सावंत यांची निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!