हुबळी येथील शेडमध्ये तयार करण्यात आले विद्युत इंजिन
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेची गती वाढावी व प्रदूषणामध्ये घट व्हावी या उद्देशाने नैर्त्रुत्य रेल्वेने विद्युत इंजिन निर्मिती केली. हुबळी येथील लोको शेडमध्ये बनविण्यात आलेल्या पहिल्या दोन विद्युत इंजिनला बेळगावमधील नद्यांची नावे देण्यात आली. एका इंजिनला ‘मलप्रभा’ तर दुसऱया इंजिनला ‘घटप्रभा’ ही नावे देण्यात आली आहेत.
देशातील सर्वच विभागांमधील रेल्वे यापुढे विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यासाठी सध्या देशातील महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे. यापूर्वी वापरण्यात येणाऱया डिझेल इंजिनमुळे मोठय़ा प्रामाणात हवा प्रदूषण होत असे. तसेच रेल्वेच्या गतीवरही मर्यादा येत होत्या. त्यामुळे रेल्वेने सर्वत्रच विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते बेंगळूर या रेल्वे मार्गावरील बऱयाचशा भागात विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर विद्युत रेल्वे धावण्याची शक्मयता आहे.
विद्युत रेल्वेसाठी लागणारे इंजिन हुबळी येथील लोको शेडमध्ये तयार करण्यात आले. शनिवारी यातील दोन इंजिनचा शुभारंभ करण्यात आला. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर व साहाय्यक व्यवस्थापक पी. के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या रेल्वे इंजिनला खानापूर तालुक्मयातील मलप्रभा तर गोकाक तालुक्मयातील घटप्रभा या दोन नद्यांची नावे देण्यात आली. यामुळे हा बेळगाचा एक सन्मानच असल्याचे सांगण्यात येत आहे.