सगाम महाविद्यालयात जिल्हा युवा महोत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ कराड
सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आयोजित केलेल्या 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उपस्थितीती लावत उद्घाटन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांत मिसळत त्यांनी तरुणाईशी दिलखुलास संवाद साधला.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अजयकुमार बन्सल, प्रांत उत्तम दिघे, सुनील गाडे, सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी वैशाली राजमाने, रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ऍड. रवींद्र पवार, ऍड. सदानंद चिंगळे, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ या मान्यवरांची उपस्थिती होती. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती या कार्यक्रमास होती.
महाविद्यालायतील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांच्या वतीने नाम फाऊंडेशनला एक लाख अकरा हजार अकरा रुपयांचा धनादेश ऍड. रवींद्र पवार यांच्या हस्ते नाना पाटेकर यांच्याकडे देण्यात आला. जिल्हा युवा महोत्सवामध्ये 46 महाविद्यालयातील 961 विद्यार्थ्यानी विविध कालाप्रकारामध्ये सहभाग नोंदवला आहे.
स्वागत प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. एम. बी. कांबळे, आर. वाय. गायकवाड, प्रा. धनाजी खोत, प्रा. आर. वाय, पाटील, प्रा. एस. एस. नांगरे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील जाधव व प्रा. डॉ. कोमल कुंदप यांनी केले. डॉ. आर. व्ही. गुरव यांनी आभार मानले.