Nana Patole : माझ्याकडे भरपूर मसाला आहे. मी यापूर्वीही इशारा दिला होता की,मला बोलायला लावू नका.घरातील वाद बाहेर आणू नका,अस सांगतानाच नाना पटोले यांनी तांबेंच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलतील अशी भूमिका घेतली. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला,पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवाल आमदार सत्यजीत तांबें यांनी केला. त्यावर आता नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मोठा वाद झाला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षातून सत्यजीत यांच्यासह त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना निलंबीत करण्यात आलं आहे. त्यानंतर सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून उमेदवारीसाठी उभे राहिले आणि भरघोस मतांनी निवडून देखील आले. विजयी झाल्यानंतर त्यांनी योग्यवेळी उत्तर देईन असं म्हटलं होते. आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत नाना पटोले यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

