ऑनलाईन टिम नवी दिल्ली
जर अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी आशिया दौऱ्यादरम्यान तैवानला भेट चीनच्या ‘लाल रेषे’ला आव्हान दिले तर “त्याचा कठोर प्रतिकार केला जाईल” असा इशारा भारतातील चिनी दूतावासाने दिला आहे. पेलोसी यांच्या आशिया दौऱ्यामुळे चीनच्या माध्यमांनी आगपाखड केली असतानाच त्यांच्या मलेशिया दौऱ्यानंतर संभाव्य तैपेई भेटीच्या वृत्तानंतर बीजिंगमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पलोसी यांच्या आशिया दौऱ्यातील हा दुसरा थांबा होता.
चीन तैवानला आपला प्रदेश मानत असल्याने बिजिंगने इशारा देऊन सूचित केले आहे की, ते पेलोसी भेटीला एक प्रमुख “एक-चीन तत्त्व हा चीन-अमेरिका संबंधांचा राजकीय पाया असून ‘तैवानच्या स्वातंत्र्या’कडे फुटीरतावादी हालचालींना आणि बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला चीन ठामपणे विरोध करत आहे. तसेच ‘तैवानच्या स्वातंत्र्य’ शक्तींना कोणत्याही प्रकारचा थारा नाही” असे भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते वांग शिओजियान यांनी ट्विट केले आहे.