Tarun Bharat

नांदेडमध्ये २५ तलवारी जप्त; दोघेजण ताब्यात

ऑनलाईन टीम/तरुण भारत

धुळ्यात (Dhule) लिसांनी कारवाई करत गुरुवारी ९० तलवारी जप्त ( Nanded Police Seized 25 Swords ) केल्यांनतर आज नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका रिक्षामधून २५ तलवारी जप्त केल्या आहेत. तर दोघांना ताब्यात घेतलं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गोकुळनगर भागात आज ही कारवाई केली आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात तलावरीचा सापडल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. (Nanded 25 Swords Found)

दरम्यान, रिक्षातून या तलवारी नेण्यात येत होत्या. या सर्व २५ तलवारी नांदेड पोलिसांनी (nanded police) जप्त केल्या. दोघा आरोपींना अटक पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केलीय. शहरातील गोकुळनगर भागातून रिक्षेतून शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईत करत रिक्षेचे तपासणी केली. तेव्हा ऑटोरिक्षामध्ये २५ तलवारी आढळून आल्या.

पोलिसांनी या प्रकरणी आकाश गोटकवाड आणि अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. विक्रीच्या उद्देशाने या तलवारी आणल्याची कबुली त्याने दिली आहे. पंजाबच्या अमृतसर येथून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपीने सांगितले.

Related Stories

“हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम”

Archana Banage

दोषींना अशी शिक्षा मिळेल…

datta jadhav

अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; बाबा रामदेव यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

Archana Banage

फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा

datta jadhav

विद्यार्थ्यांना दिलासा! पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात : वर्षा गायकवाड

Tousif Mujawar

‘हा’ चित्रपट नसून…; राहूल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Archana Banage