Tarun Bharat

विभागीय क्रीडा स्पर्धेत नंदिहळ्ळी स्कूलची बाजी

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण खाते येळ्ळूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत डीएमएस देसूर हायस्कूल येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत नंदिहळ्ळी हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. सांघिक खेळात मुलांच्या कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले तर मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. वैयक्तिक विभागात 1500 मीटर स्पर्धेत आर्यन पाटील, योगा स्पर्धेत राजेश संभाजी व सागर भातकांडे तर मुलींच्या गटात श्रेया जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविला. बुद्धिबळ स्पर्धेत गीता टोपकार, साहील पवार यांनी विजेतेपद तर भालाफेक स्पर्धेत साहील पवारने तृतीय क्रमांक पटकाविला. वरील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक एस. एम. कोलकार यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक वाय. एस. बस्तवाडकर, व्ही. जी. तारिहाळकर, एस. एस. पाटील, आर. एल. लाड यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Stories

स्मार्ट सिटीचे काम मंदावले ; हिंदवाडी रस्त्याचे काम रखडले

Patil_p

वॉर्ड आरक्षण : नगरविकास खात्याला नोटीस

Amit Kulkarni

तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीची धांदल

Patil_p

सामाजिक कार्यकर्त्यांकडून समाजसेवा

Amit Kulkarni

बेळगुंदी रविकिरण सोसायटीला साडेआठ लाखाचा नफा

Omkar B

बेळगाव विमानतळावर पोलिसांकडून मॉक ड्रील

Amit Kulkarni
error: Content is protected !!