Tarun Bharat

राणेंच्या विधानाला जयंत पाटलांच प्रत्यूत्तर; म्हणाले, स्मरण करा म्हणजे…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडा विरोधात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांना विधानसभेच्या प्रांगणात यावच लागेल असे वक्तव्य केले होते. तसेच मविआचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. शरद पवार (Sharad Pawar) हे धमक्या देत आहेत. बंडखोर आमदारांच्या केसाला धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते. याला आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. पवार साहेबांनी केलेल्या मदतीचे राणेंनी स्मरण करावे म्हणजे त्यांना आपले विधान मागे घ्यावे असे वाटेल असं वक्तव्य आज त्यांनी माध्यमांसमोर केलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांच्या विधानावर महाराष्ट्रातील माणूस कसा पाहतो हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. पवार साहेबांना विधानसभा, लोकसभा, विधिमंडळांचा अनुभव आहे. सभागृहात विधानसभेचे सदस्य आल्यानंतर काय करतात याला जास्त महत्त्व असते हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी काल केला. यावर नारायण राणे यांनी ज्या पध्दतीने वक्तव्य केले त्या पद्धतीने आम्हालाही बोलता येतं. पण लोकशाहीमध्ये गुंडगिरी करणे योग्य नाही. मात्र काही लोकांच्याकडून अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे राणे जे बोलतात याच्याकडे गांभीर्याने बघू नये असं मला वाटतं असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा- पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भेटणार-अजित पवार


पुढे बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांना आम्ही उत्तर देऊ शकतो. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. अशा नेत्यांला ज्या पद्धतीने भाषा वापरली आहे ती योग्य नाही. पवार साहेबांनी राणेंना संकटात मदत केली. आधार दिला आहे. या गोष्टींचं राणेंनी स्मरण जरी केले तरी त्यांना आपले विधान मागे घ्यावे असे वाटेल अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

Related Stories

फेसबुकच्या शेअर्सची घसरण, मार्क झुकरबर्गला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!

Abhijeet Shinde

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

Abhijeet Shinde

महाराष्ट्र सरकारकडून रेड झोनमध्येही मद्यविक्रीला सशर्त परवानगी

Rohan_P

राष्ट्रवादीने मैत्रीचा हात पुढे करून पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले

Abhijeet Shinde

…तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार : खा. उदयनराजे

datta jadhav

अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीकडून समन्स, ६ जुलैला हजर राहण्याचे आदेश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!