Tarun Bharat

‘या’ महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार, राणेंची भविष्यवाणी

ऑनलाईन टीम / वाशिम :

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राज्यातील ठाकरे सरकार कोसळेल, असा नवा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

वाशिममध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. या वादळात हलणारी झाडं फांद्यांसारखी कोसळून पडतात. राज्यातील सरकार म्हणजे तीन पक्षांचं एक झाड आहे. या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते खोडावर नाहीत. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जाणार आहे.

संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारु नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही आणि संपादक तर नाहीच नाही. त्यांची भाषा आणि वैचारिकता बघा. काळ्या पैशाने घेतलेली त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अशा माणसांना मी किंमत देत नाही, असेही राणे म्हणाले.

Related Stories

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण रद्द : अमित देशमुख यांची घोषणा

Tousif Mujawar

धनुष आणि ऐश्वर्या झाले विभक्त

Archana Banage

‘सरकारी अधिकाऱयांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी मिळणार’

Tousif Mujawar

धावपट्टीवर विमानाची ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, थरारक व्हिडीओ आला समोर

Archana Banage

पोटात गॅस झाल्यास काय करावे ? जाणून घ्या घरगुती उपाय

Archana Banage

‘बॅड बँक’ प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता

Amit Kulkarni