Tarun Bharat

मडगावात महिलेकडून पाच लाखांचे अमलीपदार्थ जप्त

ओडिशा येथील महिलेला अटक

प्रतिनिधी /मडगाव

अमलीपदार्थ विक्रीतून झटपट पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी अमलीपदार्थ तस्करीचे प्रकार गोव्यात वाढत आहेत. पोलीस कारवाई करतात, परंतु, अमलीपदार्थाची तस्करी नियंत्रणात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर काल रविवारी मडगाव येथे एका महिलेला अटक करण्यात आली असून कारवाईवेळी तिच्याकडून सुमारे साडेपाच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

मडगाव शहर पोलिसांना एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेला अटक केली आहे. आरती नायक (35) असे आरोपी महिलेचे नाव असून कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडून 5.50 लाखा किंमतीचा सुमारे 5 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, अटक केलेली महिला मुळची ओडिशाची आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात वास्तव्यास आहे. मात्र कोणत्या हेतूने ती गोव्यात आली होती याचा तपास सुरु आहे. तसेच या महिलेचा आणखी कोणत्या प्रकरणात समावेश आहे का ? तसेच तिचे अन्य कोणी साथिदार आहेत का याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती मडगावचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

Related Stories

शेतकऱयांनी प्राकृतिक शेतीकडे वळावे- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

शिवोलीत 30 एमएलडी पाईपलाईन फुटली

Amit Kulkarni

तन्वेश वेंगुर्लेकर यांची निवड

Amit Kulkarni

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

किनारी भागात व्यवसायासाठी करणार अनुकूल वातावरण

Amit Kulkarni

सत्तरीतील कणग्या,सुरण लागवडीवर सांळीदर प्राण्याचा आघात.

Patil_p