Tarun Bharat

शिंदे गटाचा आमदार भाजपाच्या गळाला?

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्याला शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भोंडेकर भाजपाच्या गळाला लागले की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नरेंद्र भोंडेकर हे भंडाऱ्यातील अपक्ष आमदार असून, ते शिंदे गटात आहेत. आज भंडाऱ्यात होत असलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशेजारी ते व्यासपीठावर बसले होते. तसेच त्यांनी गळ्यात भाजपचा गमछाही घातला होता. त्यांनी व्यासपीठावरुन भाषणही केलं.

अधिक वाचा : पाणीबिल वादातून मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याबाबत खोटी माहिती, तरुणाला ताब्यात घेऊन दिले सोडून

भोंडेकर यांनी भाषणात देवेंद्र फडणवीस हेच आपले गुरू आहेत. त्यांच्यामध्ये राज्याचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे सांगत भंडारा नगपरिषदेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. त्यामुळे भोंडेकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Related Stories

मिशन पंजाब : अरविंद केजरीवाल यांनी केल्या ‘या’ तीन घोषणा

Tousif Mujawar

गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणींची कोरोना टेस्ट, स्वतः झाले होम क्वारंटाईन

prashant_c

मराठा आरक्षण: …अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू ; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

Archana Banage

‘शिवसेनेचा मला जीवे मारण्याचा कट’, सोमय्यांकडून नवा व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

सांगली जिल्ह्यात आणखीन दोघे कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरात आठ दिवस संचारबंदी!

Tousif Mujawar
error: Content is protected !!