Tarun Bharat

नरहर कुरुंदकर यांचा ‘एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ नाट्याप्रयोग आज

प्रतिनिधी / बेळगाव

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि मराठी भाषा प्रेमी मंडळ, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली, रसिक रंजन, बेळगाव आयोजित व नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान प्रस्तुत, नरहर कुरुंदकर यांचा ‘एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हा साभिनय अभिवाचनाचा नाट्याप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. संकल्पना आणि लेखन अजय अंबेकर यांचे आहे. आणीबाणीनंतर महाराष्ट्रामधून ज्या लेखक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली त्यामध्ये कुरुंदकर यांचे नाव अग्रभागी आहे.

जागर, रुपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. साहित्यिक आणि राजकीय चळवळींना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. वैचारिक मतभेद असू शकतात पण अभ्यासाची बैठक पक्की हवी, ही त्यांची धारणा असे. आणीबाणीच्या काळात अपक्ष व्यासपीठ या नावाने त्यांनी कार्यक्रम केले, ज्यामध्ये शासनाच्या अनेक योजनांचा त्यांनी समाचार घेतला. मात्र, बहुसंख्य लोकांना कुरुंदकरांची भूमिका आणि त्यांचे साहित्य याबद्दल फारशी माहिती नाही. आज समाजाला समतोल विचारांची गरज आहे. एक वैचारिक परंतु समृद्ध करणारा असा हा अनुभव आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रायोजित हा कार्यक्रम सर्वांना नि:शुल्क खुला आहे. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कामे युद्धपातळीवर

Omkar B

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पोलीस दल सज्ज

Amit Kulkarni

बेळगाव इलेव्हन संघ हॉकी स्पर्धेत विजेता

Amit Kulkarni

शिवाजीनगर दुसरी गल्लीत महिला मंडळाची स्थापना

Omkar B

मुचंडी येथे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

गोळीबाराच्या घटनेने बेळगावात खळबळ

Patil_p