वृत्तसंस्था/ झाग्रेब
येथे होणाऱया झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेत अनेक प्रमुख मल्लांच्या गैरहजेरीत नरसिंग यादव भारतीय पथकाचे नेतृत्व करेल. आज बुधवारपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली असून या वर्षातील ही पहिली मानांकन कुस्ती स्पर्धा आहे.
भारताचे प्रमुख मल्ल बजरंग पुनिया व रवि कुमार दाहिया या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविलेल्या या दोघांव्यतिरिक्त अन्य काही मल्ल या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. त्यात महिला मल्ला विनेश फोगट, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदकविजेता दीपक पुनिया, अन्शू मलिक, बजरंगची पत्नी संगीता फोगट, सरिता मोर यांचा समावेश आहे.
बजरंग पुनियाच्या जागी घेतलेला सुजीत 65 किलो गटात खेळणार असून अमन रवि दाहियाच्या 57 किलो वजन गटात खेळेल. महिलांच्या 53 किलो गटात विनेश फोगटऐवजी सुषमा शोकीन भाग घेणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे 29 जणांचे पथक पाठविण्यात आले आहे. ग्रीको-रोमनसह या स्पर्धेत पुरुष व महिलांच्या फ्रीस्टाईल विभागातील लढती 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील. ग्रीकोöरोमनमध्ये 12, फ्रीस्टाईलमध्ये 7 महिला व 10 पुरुष मल्ल भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
Peeie´sye DeesHeve jBefkebÀie efmejerpemeeþer Yeejleer³e HeLekeÀ ë फ्रीस्टाईल (पुरुष)-अमन, पंकज मलिक, सुजीत, विशाल कालिरमना, सागर जगलान व नरसिंग यादव (दोघे 74 किलो), विकी, पृथ्वीराज पाटील (92 किलो), साहिल सेहरावत, दिनेश धनकर. महिला-शिवानी पवार, सुषमा शोकीन, सितो, भातेरी, राधिका, रीतिका, किरण. ग्रीको रोमन-मनजीत, ज्ञानेंदर, सागर, करणजित सिंग व आशू (दोघे 67 किलो), अंकित गुलिया, साजन, रोहित दाहिया, सुनील कुमार व सुशांत (दोघे 87 किलो), नरिंदर चीमा, नवीन (130 किलो).