मुंबई \ ऑनलाईन टीम
नाशिकमध्ये बुधवारी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला असून एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने उत्तर द्यावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला. या गळतीनंतर रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.