Tarun Bharat

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा कोईमतूरमध्ये

वृत्तसंस्था/ कोईमतूर

अखिल भारतीय पुरूष आणि महिलांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा येथे 29 मे पासून खेळविली जाणार आहे. 55 व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत पुरूष विभागात 9 संघांचा समावेश राहील.

पुरूष विभागात बलाढय़ भारतीय रेल्वे संघ पुन्हा जेतेपदासाठी सज्ज झाला आहे. नवी दिल्लीचा भारतीय हवाईदल, भारतीय नौदल, केएसईबी, केरळ पोलीस, बँक ऑफ बडोदा, बेंगळूर स्पोर्टस् हॉस्टेल तर महिलांच्या विभागात पूर्व रेल्वे कोलकाता, दक्षिण-मध्य रेल्वे हुबळी, मध्य रेल्वे मुंबई, केएसईबी, केरळ पोलीस या संघांचा समावेश राहील. सदर स्पर्धा साखळी बाद पद्धतीने खेळविली जाणार असून अंतिम सामना 3 जूनला होणार आहे.

Related Stories

व्हेरेव्हकडून ब्रुक्सबाय पराभूत

Patil_p

फुटबॉल शिबिरासाठी हंगामी यादी जाहीर

Patil_p

स्पेनचा फुटबॉलपटू कोरोनाविरुद्ध लढतीसाठी सज्ज

tarunbharat

शनिवारचे तिन्ही अटीतटीचे कबड्डी सामने बरोबरीत

Patil_p

रोमांचक टायनंतर आरसीबीचा सनसनाटी विजय

Patil_p

पहिल्या हॉकी फाईव्ह स्पर्धेत भारत विजेता

Patil_p