वृत्तसंस्था/ इटानगर (अरुणाचल प्रदेश)
कनिष्ठ मुलांची पाचवी राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा येथे 9 ते 14 जुलै दरम्यान आयोजित केली आहे. सदर स्पर्धा इटानगरच्या डॉन बॉस्को कॉलेजच्या मैदानावर होणार असून सर्व सुविधा या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय स्पर्धा भरविण्याची संधी दिल्याबद्दल अरुणाचल हौशी मुष्टीयुद्ध संघटनेने अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे आभार मानले आहे. या स्पर्धेमध्ये 26 राज्यातील सुमारे 500 स्पर्धक भाग घेणार आहेत. सदर स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही यजमान राज्याच्या मुष्टीयुद्ध संघटनेने दिली आहे.