Tarun Bharat

KCR; राज्ये कमकुवत करण्याचा केंद्र सरकारचा कट : केसीआर यांचा भाजपवर हल्लाबोल

ऑनलाईन टिम : हैदराबाद

केंद्रातील एनडीए सरकार राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा कट रचत आहे, तसेच भाजपेत्तर राज्याबरोबर तेलंगणासोबत भेदभावही हा भेदभाव केला जात आहे असा आरोप करून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फक्त भाजपच नाही तर आतापर्यंत केंद्रात सत्तेवर असलेल्या सर्व सरकारांनी राज्यघटनेच्या भावनेला तडा देऊन राज्यांची स्वायत्तता संपवली, असे ते म्हणाले. तेलंगणा राज्य स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

आपल्या भाषणात बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले,”सध्या केंद्रात सत्तेवर असलेले सरकार “सशक्त केंद्र आणि कमकुवत राज्ये” या सिद्धांतावर चालत आहे. त्यामुळेच एनडीए सरकारच्या कारकिर्दीत राज्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.”

पुढे बोलताना म्हणाले केसीआर म्हणाले की, “केंद्र सरकार राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत असून, राज्यांचा संवैधानिक हक्क मारण्यासाठी केंद्र सरकार उपकराच्या रूपात कर बदल करत आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांचे लाखो कोटी रुपयांची उधळपट्टी होत आहे. केंद्र मनमानीपद्धतीने विविध प्रकारचे निर्बंध लादून राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. राज्यांनी एफआरबीएमच्या तरतुदींचे पालन करावे असा केंद्राचा आग्रह असला तरी तेलंगणा राज्याने तसे वर्तन केले नाही. असे राव म्हणाले.

Related Stories

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी; 19,744 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता

Abhijeet Khandekar

एकनाथ खडसेंना मोठा धक्का; ईडीकडून जावई गिरीश चौधरी यांना अटक

Archana Banage

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

Archana Banage

उत्तरेत पाऊस तसेच बर्फवृष्टीचा अंदाज

datta jadhav

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 10,309 नवे कोरोना रुग्ण; 334 मृत्यू

Tousif Mujawar

सक्रिय रुग्णसंख्या 25 लाखांसमीप

datta jadhav