सांखळी/प्रतिनिधी
थ्रिफ्ट सहकारी संघटना व उत्तर गोव्यातील आठ अग्रगण्य पाथसंस्था?च्या संयुक्त विद्यमाने रवींद्र भवन साखळी येथे राष्ट्रिय सहकार सप्ताह पार पडला. या वेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, गोवा राज्य सहकारी बँक चे अध्यक्ष उल्ल्हास फळदेसाई , थ्रिफ्ट सहकारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर,सहकारी पतसंस्था रजिस्ट्रार अधिकारी विशांत गावणेकर व आठही पथसंस्थेचे अध्यक्ष या वेळी उपस्थित होते.
केवळ कर्ज देणे व घेणे येवढय़ा पुरते मर्यादित न राहता येणार्या काळात सर्व संस्था?नी बहुउद्देशीय व बहुआयामी व्हायला पाहिजे व येत्या वर्षाच्या शेवट पर्यंत राज्यात आणखी 200 नवीन संस्था निर्माण करायला पाहिजे असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. उल्हास फळदेसाई यांनी संस्था जर समृध्द करायची असेल तर सरकारी योजनांचा योग्य उपयोग करून मदत करणे हे केवळ सहकारानेच शक्मय आहे असे सांगितले. एकनाथ कवाठणकर यांनी मार्गदर्शन केले. पांडुरंग कुत्तिकार यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व पथसांस्थेच्या अध्यक्षांनी या वेळी आपआपले विचार मांडले. प्रिया तांगसाळी यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पथासंस्थाच्या अध्यक्षांना या वेळी गौरविण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटण्यात आले.