Tarun Bharat

वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

National Consumer Day celebrated at Vengurle Tehsildar Office

वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन वेंगुर्लेचे नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम वाडेकर व वेंगुर्ले तालुका रास्त भाव धान्युदकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे उदघाटन नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांत पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम वाडेकर, पुरवठा लिपीक सतीश हराळे. वेंगुर्ले तालुका धान्यदुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, खजिनदार अशोक राणे यासह तालुक्यातील रास्त भाव धान्यदुकानदार याचा समावेश होता.ग्राहकांचे हित, आवश्यक ग्राहकिय ज्ञान व ग्राहक म्हणून असलेली कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. तर पुरवठा अधिकारी प्रितम वाडेकर यांनी, ग्राहक दिनाचे महत्व, ग्राहकांची सजगता याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत पुरवठा लिपिक सतीश हराळे यांनी आपले अनुभव कथन केले.

वेंगुर्ले (वार्ताहर)-


Related Stories

शाळा प्रवेशासाठीची वयोमर्यादा निश्चित

NIKHIL_N

सक्षम कारणावरच गोव्यात प्रवेश

NIKHIL_N

191 कोटीचा निधी काय विमानाने ‘उडवून’ आणणार?

NIKHIL_N

चाकरमान्यांच्या एसटीला अपघात

Patil_p

तुम्ही केलेली मदत वाचवू शकतात बळीरामचे प्राण

Anuja Kudatarkar

दोडामार्ग बाजारपेठेत दारू जप्त, दोघेजण ताब्यात

Anuja Kudatarkar