Tarun Bharat

संतिबस्तवाड येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

Advertisements

वार्ताहर/ किणये

प्राथमिक आरोग्य केंद्र किणये यांच्यावतीने संतिबस्तवाड येथील सेंट जोसेफ शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संतिबस्तवाड भागातील शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक औषध व गोळय़ा देण्यात आल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा खोत उपस्थित होत्या.

आपल्या शरीरात विविध प्रकारचे रोग पोटाच्या आजारापासून होतात. पोट साफ होणे गरजेचे असते. पोटातील जंतूंचा नाश करण्यासाठी आरोग्य खात्याकडून हे औषध देण्यात आले आहे, असे डॉ. खोत यांनी सांगितले. रोजच्या आहारात कोणकोणते पदार्थ असावेत आणि कोणते पदार्थ सेवन करू नयेत, तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

किणये प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने संतिबस्तवाड परिसरातील सुमारे 1500 विद्यार्थ्यांना या जंतनाशकाचे औषध मोफत देण्यात आले.

यावेळी बसाप्पा बिरमुत्ती, मुख्याध्यापिका लेविना, मंजुळा कुंभार, प्रदीप कापसे, रेश्मा देसाई आदी उपस्थित होते. 

Related Stories

वीट कामगारांच्या मुलांसाठी सिंगिनकोप येथे शिक्षणाची सोय

tarunbharat

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमांना न्यायालयाने ठरविले दोषी

Patil_p

महात्मा गांधी नगरविकास कामाच्या निविदा रद्द करण्याची मागणी

Patil_p

जीआयटी एमबीए विभागातर्फे चर्चासत्र

Amit Kulkarni

बेळगुंदीत भव्य रिंगण सोहळा

Amit Kulkarni

बकऱ्यांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल

mithun mane
error: Content is protected !!